PM POSHAN Smartशालेय पोषण आहार व्यवस्थापन प्रणाली
❓

मदत / FAQ

नेहमी विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे

📝 रोजची नोंद कशी भरायची?
  1. डॅशबोर्डवरील इ. १ ते ५ किंवा इ. ६ ते ८ कार्ड उघडा.
  2. आजची हजर संख्या भरा.
  3. पाककृती तपासा — नियोजित पाककृती आपोआप येते, गरज असल्यास बदला.
  4. सेव्ह दाबा. घटकांचा वापर, अनुदान व शिल्लक आपोआप मोजली जाते.
📦 मागील शिल्लक कशी भरायची?

नवीन नोंदणीनंतर सर्वात आधी मागील शिल्लक (कि.ग्रॅ.) एकदा भरा.

  • पुढील महिन्यांची शिल्लक मागील महिन्याच्या अंतिम शिल्लकेतून आपोआप येते.
  • भरल्यानंतर डॅशबोर्डवरील सूचना आपोआप निघून जाते.
📅 एखादा दिवस राहिला असेल तर?

डॅशबोर्डवरील दिनदर्शिका उघडा. नोंद राहिलेले दिवस वेगळ्या रंगात दिसतात. त्या दिवसावर टॅप करून मागील तारखेची नोंद भरता येते.

🏖️ सुट्टी कशी नोंदवायची?

आज सुट्टी आहे निवडा किंवा सुट्टी जोडा वापरा. रविवार आपोआप सुट्टी धरला जातो. सर्व सुट्ट्या प्रिंटमध्ये लाल रंगात दिसतात.

🖨️ PDF / प्रिंट कशी काढायची?
  1. डॅशबोर्डवरील PDF डाउनलोड / प्रिंट उघडा.
  2. हवी ती पाने व महिना निवडा.
  3. PDF डाउनलोड दाबा. प्रिंट घ्यायची असल्यास A4 कागद व Margins: None निवडा.
मोबाईलवर प्रिंट पाहण्यापूर्वी एकदा पान पूर्ण लोड होऊ द्या.
🍽️ चव रजिस्टर काय आहे?

महिन्याचे चव रजिस्टर आपोआप तयार होते — तारीख, वार, मेनू, चव घेणाऱ्याचे नाव, अभिप्राय व सही. डॅशबोर्डवरील चव रजिस्टर कार्डमधून प्रिंट करा.

🔑 पासवर्ड विसरलात?

लॉगिन पानावरील पासवर्ड विसरलात? वापरा. न जमल्यास संपर्क पानावरून आम्हाला कळवा.

💳 सदस्यता संपली तर?

नवीन नोंदणीला काही काळ मोफत वापर मिळतो. मुदत संपल्यावर "निष्क्रिय" पान दिसते. तेथील QR द्वारे पेमेंट करून पावती/UTR कळवा — पडताळणीनंतर खाते पुन्हा सुरू केले जाते.

📱 मोबाईलवर ॲप कसे इन्स्टॉल करायचे?

Chrome मध्ये साइट उघडा → मेनू (⋮) → Add to Home screen / Install app. एका टॅपमध्ये ॲप उघडेल.

← अ‍ॅपकडे परत
© PM POSHAN Smart